Breaking News

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय 33 आहे.

महिलेनेच तिचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. सोमवारी रात्री दारु पित असताना महिलेने कुठलेही कारण नसताना माझ्या कानाखाली मारली. मीसुद्धा तिच्या कानशिलात लगावली. त्याच वेळी महिलेने माझ्या दिशेने दारूने भरलेले ग्लास फेकून मारले, असे मानने पोलिसांना सांगितले. दरम्यान, दोघांमध्ये हाणामारी सुरु झाल्यानंतर मानने गळा आवळून तिची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. वर्षभरापूर्वी दोघांची सोशल मीडियावरून ओळख झाली होती. हॉटेल स्टाफकडून मिळालेल्या माहितीनुसार महिलेच्या नावाने ऑनलाइन रुम बुक करण्यात आली होती. महिला विवाहित असून, तिला दोन मुले आहेत. मागच्या पाच महिन्यात महिला आणि आरोपी विक्की मान सहा ते सात वेळा या हॉटेलमध्ये आले होते.

Check Also

उरणमधील एसएच १०३ रस्त्याच्या रूंदीकरणाला मंजुरी

आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश उरण ः रामप्रहर वृत्तद्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील …

Leave a Reply