पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने डॉ. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने आमचा चषक ‘रायगड श्री 2019’ जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा कामोठे येथे पोलीस स्टेशनसमोर रविवारी (दि. 10) रोजी सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.
या स्पर्धेतून रायगड जिल्हा संघ निवडून दिनांक 16-17 मार्च रोजी होणार्या चिखली, बुलढाणा येथे ‘महाराष्ट्र श्री 2019’ या स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. ही स्पर्धा वजनी गटात होणार असून, मेन फिजीक खुला गट असेल. वजनी गटात 55 किग्रॅ, 60 किग्रॅ, 65 किग्रॅ, 70 किग्रॅ आणि 70 किग्रॅवरील खुला गट असेल.
या वेळी रोख पारितोषिके 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार, 1 हजार चषक, मेडल, प्रमाणपत्र देण्यात येईल, तसेच किताब विजेत्यास 51,000 रुपये रोख व मानाचा पट्टा चषक देण्यात येइल. बेस्ट पोझर 3 हजार आणि मोटर इंम्प्रोमेंट 3 रुपये देण्यात येईल.
निवडण्यात आलेल्या सर्व स्पर्धकांना ट्रॅक सूट देण्यात येतील, तसेच सहभाग घेणार्या सर्व स्पर्धकांना चषक देण्यात येईल. रायगड संघाचे टीम कोच म्हणून सेक्रेटरी दिनेश शेळके आणि कार्याध्यक्ष मारुती आडकर हे सांभाळतील.