Breaking News

रसायनीजवळ भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू

मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी

सांगली येथे विवाह सोहळा आटोपून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून परतणार्‍यांची स्विफ्ट कार टँकरला धडकून कारमधील तीन महिला व चालक असे चार जण जागीच ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिस गावाजवळ शुक्रवारी (दि. 29) पहाटे 5च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये डोंबिवली व नवी मुंबईतील रहिवाशांचा समावेश आहे.

सांगलीहून मुंबईच्या दिशेने निघालेली स्विफ्ट कार (एमएच 11 सीएच 1889) एक्स्प्रेस वेवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसवाडी गावाजवळ आली असता, ती पुढे जात असलेल्या एचपी टँकरला (एमएच 43 बिजी 7011)पाठीमागून जोरात धडकली. या अपघातात कारचालक अक्षय नारायण कोकरे (वय 32), सविता लक्ष्मण मोटे (वय 36, डोंबिवली), राणी मोहन खरगे (वय 30), रिया मोहन खरगे (वय अंदाजे 13, रा. कळंबोली) जागीच ठार झाले, तर शोभा पोपटी वडगणे ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या अपघाताची माहिती मिळताच द्रुतगती महामार्गावरील पथक, पोलीस, डेल्टा फोर्स व अपघातग्रस्तांसाठी मदत करणार्‍यांच्या गु्रपने घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की अर्ध्या कारचा अक्षरशः चुराडा झाला. मृतांचे चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …

Leave a Reply