Tuesday , March 28 2023
Breaking News

कुलदीपच्या प्रगतीचा चढता आलेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. भारताचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. या वेळी कुलदीप संघासाठी धावून आला.

कुलदीप यादवने तीन बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. त्याने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडले. या कामगिरीसह कुलदीपने 42 वन डे सामन्यानंतर सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. कुलदीपच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 85 बळी जमा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कशी कुलदीपने बरोबरी साधली; तर न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन बाँडला मागे टाकले.

Check Also

जलतरणपटू प्रभात कोळीचा भीमपराक्रम

न्यूझीलंडची कूक स्ट्राईट खाडी पोहून केली पार सात आव्हाने पूर्ण करणारा ठरला सर्वांत युवा स्विमर पनवेल …

Leave a Reply