Wednesday , February 8 2023
Breaking News

रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिवडणूक 9 जानेवारीला होणार असून भाजप, आरपीआय व मित्रपक्षाच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना मतदारांचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे.
महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व शहराध्यक्ष जयंत पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रूचिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. या वेळी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले, तर युवा मतदारांनी शुभेच्छा दिल्या. कै. मुग्धा लोंढे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी रूचिता लोंढे या आईच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. त्यामुळे रूचिता यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रचारात मतदारराजाचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून कार्यकर्ते रूचिता लोंढे यांना विजयी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
या वेळी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, संदीप लोंढे, अमित ओझे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरिश मोकल, पवन सोनी, चिन्मय समेळ, स्वाती कोळी, अर्पिता मोकल, सुहासिनी केकाणे, स्नेहल खरे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply