Friday , September 29 2023
Breaking News

भारताचे सहा बॉक्सर उपांत्य फेरीत दाखल

फिनलँड : वृत्तसंस्था

38व्या आंतरराष्ट्रीय जीबी बॉक्सिंग स्पर्धेत तीन वेळा आशियाई विजेता शिवा थापा (60 किलो) आणि माजी युवा विश्वविजेता सचिव सिवाच (52 किलो) यांच्यासह सहा भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठून पदकाची निश्चिती केली आहे.

माजी विश्व अजिंक्यपद कांस्यपदक विजेत्या थापाने पोलंडच्या डॉमिनिक पलकचा उपांत्यपूर्व फेरीत 5-0 असा पराभव केला. सिवाचने रशियाच्या तामिर गालानोव्हला 4-1 असे नामोहरम केले. राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता मोहम्मद हसमुद्दीन (56 किलो), कविंदर सिंग बिश्त (56 किलो), दिनेश्या डागर (69 किलो) आणि नवीन कुमार (+91 किलो) यांनीही उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

Check Also

वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर; 15 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना

मुंबई : प्रतिनिधी यंदा भारताच्या यजमानपदाखाली खेळल्या जाणार्‍या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी (दि. …

Leave a Reply