Breaking News

रिस हद्दीत स्त्रीचा सांगाडा

मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी

रिस-कांबे येथील श्री वैष्णोनगरीच्या काही अंतरावर असलेल्या कातरीच्या माळावर एका स्त्रीचा सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात महिलेला निर्मनुष्य जागेत जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत तिथेच टाकण्यात आल्याचे दिसते.यासंदर्भात रसायनी पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या सांगाड्याची पाहणी केली असता तो स्त्रीचा असून, तिचे वय अंदाजे 22 ते 25 आहे. या वेळी या सांगाड्यात दागिने, कपडे तसेच नायलॉन दोरीचा तुकडा आढळून आला. पोलिसांनी डॉक्टर व फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांना पाचारण करून  त्यांच्याकडून तपासणी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी घेरीडकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनीही घटनास्थळाला भेट दिली. अधिक तपास सुरू आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply