Breaking News

पोदी भुयारी मार्गाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश

पनवेल : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणार्‍या भुयारी मार्गाच्या (रेल्वे अंडर पास) कामासंदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते त्याचे शुक्रवारी (दि. 24) मध्यरात्री लोकार्पण करण्यात आले. नवीन पनवेलमधील सेक्टर 15 , 15 ए 16, पोदी व विचुंबे या भागातून राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किंवा एचडीएफसी सर्कलच्या पुलावरून जावे लागत होते. या पुलावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते, तर पोदीजवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत होते. त्यामुळे भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती. या भुयारी मार्गासाठी 10 कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आले आहेत. या आधुनिक पद्धतीने रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक न घेता बांधलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पोदीवरील गेट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार होता. त्यापूर्वी भुयारी मार्ग सुरू होणे गरजेचे असल्याने मध्यरात्री महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, नगरसेविका चारुशीला घरत, सुशीला घरत, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, किशोर मोरे, जगदीश घरत, जयेश ठाकुर, शैलेश पाटील, कमलाकर घरत, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे, श्रीकांत बापट, डॉ. मनीष बेहेरे, रेल्वेचे मुख्य अभियंता राजू मिश्रा आणि उप अभियंता आशुतोष कुमार आदी उपस्थित होते. ठेकेदाराच्या टेंडरमधील कालावधीप्रमाणे मे 2018मध्ये काम पूर्ण होणे गरजेचे होते, पण डिसेंबर 2017पासून काम बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. अखेर सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन हा मार्ग खुला झाला आहे.

पोदीवरील भुयारी मार्ग सुरू झाल्याने नवीन पनवेल, विचुंबेपासून उसर्लीपर्यंतच्या नागरिकांना पनवेलमध्ये जाण्यासाठी सोयीचे होणार आहे. शाळेत जाणार्‍या मुलांना ही त्याचा फायदा होणार आहे. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळणार आहेत. या मार्गासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेले प्रयत्न आणि प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे ऋणी आहोत.

-अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply