Breaking News

‘सीएफआय’तर्फे हमरापूर येथे स्वच्छता अभियान; नागरिकांमध्ये जागृती

पेण : प्रतिनिधी

सीएफआय, बीएनवाय, एम्पॉवर आणि हमरापूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी हमरापूर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात एकूण 120 किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यानंतर गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदीबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ.किशोर देशमुख यांनी प्लास्टिक आपल्यासाठी किती धोकादायक आहे याची सविस्तर माहिती दिली.

आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे मॅग्नुस्सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमिला स्कॅरे, सीएफआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख, समाजसेविका अश्विनी म्हात्रे,  समाजसेवक सुरेश पाटील, हमरापूरचे सरपंच प्रदीप म्हात्रे,  विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. या स्वच्छता अभियानामुळे व प्लास्टिक वेस्ट कलेक्शन केंद्रामुळे गावातील तसेच आजूबाजूच्या गावातीलही कचरा कमी होण्यास मदत होईल व गाव स्वच्छ व प्लास्टिक मुक्त होईल असा विश्वास सीएफआयचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.

प्लास्टिक कलेक्शन केंद्रसीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर यांच्या संयुक्त विद्यमाने हमरापूर येथे प्लास्टिक कलेक्शन केंद्र सुरु करण्यात आले असून केंद्राची सर्व जबाबदारी अनिशा अनिल चव्हाण या सांभााळीत आहेत. या केंद्रात स्वच्छ व नरम प्लास्टिक, स्वच्छ व धुतलेल्या प्लास्टिक बाटल्या प्रति किलो 35रुपये या दराने घेण्यात येणार आहेत.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply