Breaking News

बलात्कार करणार्या नराधमास सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधमास पनवेल सत्र न्यायालयाने 14वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. प्रदिप गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय न्यायालयाने आरोपीला 80हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पीडित मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर असल्याचे पाहून आरोपी प्रदिप याने 14 फेब्रुवारी 2018 रोजी तिच्या घरात प्रवेश केला. व चौदा वर्षीय मुलीवर बळजबरीने शारीरिक संबध प्रस्तापित केले. याबाबत आई वडिलांना सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही प्रदिप याने तिच्याबरोबर शरीर संबध ठेवले. यातून ती गरोदर राहिली. पीडित मुलीच्या आईला संशय आल्याने तीने मुलीची वैद्यकीय तपासणी करून घेतली. यात ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पीडित मुलीने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 376(जे)(एन), 506(2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अर्थात पॉस्को कायद्यातील कलम 3,4,5(जे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात शासकीय अभिव्योक्ता म्हणून अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी, दरम्यान एकुण 10 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडित मुलगी, तिची आई, न्यायवैज्ञानिक तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी, तपासिक अमंलदार रुपाली चौधरी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रदिप गायकवाड याला दोषी ठरवले. आरोपीला 14 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली तसेच एकूण 80 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply