Breaking News

महाडमध्ये चोरी करणार्या महिलांना अटक

महाड : प्रतिनिधी

येथील बाजारपेठेतील गर्दीचा फायदा घेत चोरी करणार्‍या दोन महिलांना गुरुवारी (दि. 20) दुपारी महाडमधील नागरिकांनी रंगेहाथ पकडले. या दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाड तालुक्यातील नागाव येथील संतोष हेमचंद शेठ हे आपल्या नातीच्या लग्नाकरिता दागिन्यांची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी बाजारपेठेतील रामचंद्र पानाचंद्र शेठ यांच्याकडून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. त्यानंतर संतोष शेठ आपल्या घरी नागावला जात असताना बाजारातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आठ वर्षीय मुलीने शेठ यांच्या बॅगेतून दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. या वेळी जवळच फळविक्री करणारे दगडू शिगवण यांनी महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोन महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या मुलीला अटक केली आहे.

Check Also

वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!

वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …

Leave a Reply