उरण : वार्ताहर
पावसालाजवळ आला की चार महिने पुरेल असा लाल तिखट मसाला, पापड, कडधान्य व चवीसाठी घरगुती लोणचे आदी वस्तूंचा साठा महिला वर्ग करीत असतात. त्यामुळे आंब्याचे लोणचे बनविण्यासाठी कैरीला मागणी वाढली असून महिला वर्ग कैरी खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. उरणमध्ये सीटीझन हायस्कूल, सोनाली शॉपिंग, गांधी चौक, राजपाल नाका, आनंद नगर, उरण चार फाटा, बाजार पेठ आदी ठिकाणी कैरी विक्रेते बसलेले पहावयास मिळत आहेत. पावसाळ्यात जेवणात लोणचे हे सर्रास असतेच. बाजारात अनेक कंपनीचे तयार लोणचे उपलब्ध असतात, परंतु घरी बनविलेल्या आंब्यांच्या लोणचे व त्यांची चव वेगळी असते. अनेक महिला वर्ग तयार कैर्या आणून घरगुती लोणचे बनवितात. घरगुती लोणच्यात चांगल्या प्रतीचे चांगल्या कंपनीचे तेल इतर मसाला सामुग्री टाकली जाते. त्यास चवही चांगली येते. बाजारात तयार लोणची उपलब्ध आहेत. अनेक कंपन्या तयार लोणचे आंब्याचे, लिंबाचे, मिक्स, मिरची अशा प्रकारचे लोणचे बाजारात मिळतात, परंतु घरी बनविलेल्या लोणच्याची चव खूपच चांगली लागते. चांगल्या प्रतीचे कैरी आपण विकत घेतो, चांगले मसाला सामुग्री टाकतो. त्याकडे विशेष लक्ष दिले जाते. आम्ही घरगुती लोणचे बनवणे पसंत करतो. पावसाळ्या पूर्वी चार महिने पुरेल एवढे लोणचे बनवितो, असे सनद पाटील यांनी सांगितले.
कैरी 50 ते 70 रुपये किलो या दराने आम्ही विकतो. कच्ची कैरी 20 रुपये किलो या दराने कापून देतो. नागरिक कैर्या कापून घेणे पसंत करतात. कैरीच्या आकारावरून व जातीवरून किंमत ठरवली जाते. चांगल्या प्रतीच्या आंब्यांच्या कैरींना भावही चांगला मिळतो.
-जयश्री रामकिशन परदेशी, कैरी विक्रेती, उरण
RamPrahar – The Panvel Daily Paper