Breaking News

चिल्हार नदीवर साकारला वनराई बंधारा; सुगवे ग्रामस्थांचे श्रमदान; शेतकर्यांची समस्या सुटणार

कर्जत ़: बातमीदार

तालुक्यातील सुगवे गावाच्या पाठीमागून चिल्हार नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. मात्र हीच चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते. सुगवे ग्रामस्थांनी बोरिवली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चिल्हार नदीवर मोठ्या आकाराचा वनराई बंधारा बांधला आहे. या वनराई बंधार्‍यामुळे परिसरात तब्बल एक किलोमीटर अंतर भागात पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.

कर्जत तालुक्यातील चिल्हार नदी जामरुंगपासून पुढे वाहत कोल्हारे येथे उल्हास नदीला मिळते, मात्र या प्रवासात चिल्हार नदी उन्हाळ्यात कोरडी असते. परिणामी या नदीवर अनेक ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात आले असून, त्या बंधार्‍यामुळे  अडलेल्या पाण्यावर परिसरातील शेतकरी भाजीपाला शेती करतात, मात्र  हे सिमेंट बंधारे काही काळानंतर नादुरुस्त होत असल्याने त्यात पाणीसाठा पूर्ण क्षमतेने राहत नाही. ही बाब लक्षात घेऊन बोरिवली ग्रामपंचायतीने चिल्हार नदीवर अनेक ठिकाणी मातीचे बांध तर काही ठिकाणी सिमेंटच्या पिशव्यात माती भरून वनराई बंधारे बांधण्यावर भर देण्यात आला आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील सुगवे ग्रामस्थांनी आपल्या हद्दीतील चिल्हार नदीपात्रात श्रमदान करून मोठ्या लांबीचे वनराई बंधारे

बांधले आहेत.

या सर्व वनराई, तसेच मातीच्या बंधार्‍यांत साठलेल्या पाण्याचा फायदा शेतकर्‍यांना भाजीपाला शेती करण्यासाठी, तसेचकाही शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी होणार आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply