Breaking News

लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण

खोपोली : प्रतिनिधी

लग्नाचे प्रलोभन दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करून तिला जबरदस्तीने चार वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोशन रामचंद्र कुरंगळे (रा. रिस कांबे, ता. खालापूर) याच्या विरोधात रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पीडित तरुणीचे 2017 साली झालेले लग्न मोडले होते. त्यानंतर रोशनने पीडितेला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडितेला चार वेळा गर्भधारणा झाली होती. रोशनने चारही वेळा तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. दरम्यान, रोशनने पीडितेला अंधारात ठेवून दुसर्‍या मुलीसोबत लग्न केले. त्यामुळे पीडितेने रसायनी पोलीस ठाण्यात रोशनविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी निरीक्षक सुजाता तानवडे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply