Breaking News

कोरोनाविरुद्धचे युद्ध 21 दिवसांत जिंकायचेय!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर बुधवारी (दि. 25) पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आता आपल्याला 21 दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचे आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.
मोदी म्हणाले, महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आज कोरोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी 21 दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण 21 दिवसांतच जिंकायचे आहे. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज 130 कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासीयांचीदेखील मोठी भूमिका असेल.
कोरोनाच्या आजाराचा फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक तयार्‍या केल्या जात आहेत. सर्वांना या काळात घरांमध्ये राहणे गरजेचे आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. कोरोनाच्या संक्रमितांची जगात एक लाखापेक्षा अधिक संख्या झाली आहे. भारतात डझनभर लोक करोनाच्या तावडीतून बाहेर पडले आहेत, असेही मोदी या वेळी म्हणाले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply