Breaking News

नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांनी औषध फवारणी

पनवेल : वार्ताहर

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी केली असल्याने नागरिकांना घरातच बसावे लागते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने तसेच या रोगाचा फैलाव पनवेल परिसरात होऊ नये या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी शुक्रवारी प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्व सोसायट्यांच्या आत जाऊन पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागाकडून सोडियम हायड्रोकोलीड या औषधाची फवारणी करून घेतली तसेच जंतुनाशक फवारणीही केली. पनवेल महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त काळजी घेत असून सर्वत्र टप्प्याटप्प्याने औषध फवारणी अर्थात निर्जंतुकीकरण आधुनिक यंत्रणेचा वापर करून करणे हे काम सुरू असून शुक्रवारी प्रभाग क्रमांक 18 मध्ये स्थानिक नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड यांच्या साथीने प्रभागातील प्रत्येक इमारतीत जाऊन सोडियम हायड्रोकोलीड या औषधाची फवारणी करून घेतली तसेच जंतुनाशक फवारणीही केली. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, औषध किंवा जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, त्यावेळी त्यांनी मास्क वापरावा. तसेच सॅनिटायझरचा उपयोग करावा, नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पनवेल महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी नगरसेवक हे नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पायोनियर विभागातील माझे जनसंपर्क कार्यालय नागरिकांच्या  सेवेसाठी खुले असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी मला फोन करावा, असे आवाहन नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी या वेळी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply