Breaking News

लॉकडाऊन वाढणार?

राज्यांच्या मागणीवर केंद्र सरकारचे विचारमंथन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये कोरोनामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनीही लॉकडाऊन वाढवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या मागणीवर केंद्र सरकारने विचार सुरू केला असून, 14 एप्रिलनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन घोषित केला. या लॉकडाऊनला 14 दिवस पूर्ण झाले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. महाराष्ट्रासह लॉकडाऊन संपायला सात दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, छत्तीसगढ आणि झारखंड सरकारने आधीच लॉकडाऊन वाढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारकडेही लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवणार नसल्याचे म्हटले होते, मात्र अनेक राज्यांतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन वाढवण्याच्या मागणीवर विचार करण्यात येत आहे. अनेक राज्यांनी, तज्ज्ञांनी ही मागणी केली आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार लॉकडाऊनसंदर्भात विचार करीत असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply