Breaking News

माजी सरपंचांकडून पागोटेत शिधावाटप

उरण ः रामप्रहर वृत्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून पागोटे गावच्या माजी सरपंच पूनम योगेश पाटील आणि त्यांचे पती तथा माजी सरपंच योगेश पाटील यांनी पागोटे गावातील भाजप पक्षातर्फे तसेच जय मल्हार क्रिकेट क्लब पागोटे यांच्या वतीने भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पागोटे गावातील रहिवाशांना लॉकडाऊनच्या काळात घरपोच डिलिव्हरी करीत शिधावाटप केले.   उरण तालुक्यातील पागोटे गावातील शेतकर्‍यांनी 1984 सालच्या गौरव व शौर्यशाली लढ्यात हौतात्म्य पत्करले आहे. त्या हुतात्म्यांच्या गावातील रहिवाशांना लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी पागोटे गावच्या माजी सरपंच पूनम पाटील व त्यांचे पती तथा गावचे माजी सरपंच योगेश पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली पागोटे गावातील रहिवाशांना लॉकडाऊनच्या काळात तांदूळ, साखर, कडधान्याबरोबर कांदे, बटाटे या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पागोटे गावचे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या हस्ते केले. या वेळी पागोटे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जय मल्हार क्रिकेट क्लब पागोटेचे सभासद उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेल येथे भीम जयंती महोत्सव; गायक आनंद शिंदे यांचा बहारदार कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीचे …

Leave a Reply