Breaking News

कोलाड पोलिसांकडून 116 वाहने जप्त

रोहे : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. या काळात विनाकारण फिरणारी दुचाकी व चारचाकी वाहने कोलाड पोलिसांनी जप्त केली आहे. सहाय्यक निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात कोलाड पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्या अंतर्गत विनाकारण फिरणार्‍या चालकांच्या 116 दुचाकी आणि दोन चारचाकी वाहने कोलाड पोलिसांनी जप्त केली. ही सर्व वाहने कोलाड पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहेत.

Check Also

युवा नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्मेट वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते व विद्यमान नगरसेवक परेश …

Leave a Reply