Breaking News

मौजे शास्त्रीनगर, खोपोली परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

अलिबाग ः जिमाका

जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे शास्त्रीनगर, खोपोली येथे एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेले शास्त्रीनगर, खोपोली येथील प्रभाग क्र. 12 शास्त्रीनगर व प्रभाग क्र. 11 विनानगर, खोपोली, ता. खालापूर हा परिसर (हॉस्पिटल व औषधांची दुकाने वगळून) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार  कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply