Breaking News

पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप

पनवेल ः वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेल्या पोलीस प्रशासनाच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे अधिकारी-कर्मचार्‍यांना पाच लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहे. ते सतत जागरूक असतात. त्यांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशन व निकेशा केमिकल्स प्रा. लि. यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. क्रांतिज्योत महिला विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा रूपाली शिंदे, निकेशा केमिकल्स प्रा. लि.चे मृगेश दोषी यांच्या हस्ते सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply