Breaking News

हाच का तुमचा माणुसकी धर्म?

भाजपकडून शिवसेनेच्या संजय राऊतांवर पलटवार

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात कोरोना संकटकाळात स्थलांतरित मजुरांसाठी अभिनेता सोनू सूद करीत असलेल्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली. काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या टीकेवर भाजपकडून पलटवार करण्यात आला आहे.
भाजपचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले. स्वत:ही करायचे नाही आणि सोनू सूदसारखे लोक माणुसकीसाठी पुढे येऊन गोरगरिबांना मदत करीत आहेत, त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत टीका करीत आहेत. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे.
‘त्या’पलिकडे काय केलंत? मनसेचा राऊतांना सवाल!
मुंबई : राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर मनसेनेदेखील सूदवरील टिप्पणी प्रकरणात उडी घेतली आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केले, असा सवाल खोपकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे ज्याने काम केलंय त्याचं कौतुक करूया, मनाचा मोठेपणा दाखवूया असे सांगून, रडण्यापलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार, असा टोलाही खोपकरांनी राऊतांना लगावला आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply