Breaking News

माथेरानमधील तीन रुग्णांची कोरोनावर मात; नागरिकांकडून स्वागत

माथेरान : रामप्रहर वृत्त

माथेरानमधील कोरोनाची बाधा असल्याचे अहवाल मिळालेले तीन रुग्ण रविवारी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन माथेरानमध्ये परतल्याने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.  माथेरानमध्ये 19 मे रोजी इथेच एका हॉटेलमध्ये काम करणारे दांपत्यांपैकी एकाला कोरोनाची लागण दिसून आली होती आणि त्यात एक महिला पोजिटिव्ह रुग्ण सापडल्याने गावात संपूर्ण घबराट पसरली होती. या दांपत्यांना ज्याठिकाणी क्वारंटाइन करण्यात आले होते त्याच ठिकाणी आपल्या गावातील दोन महिला सुध्दा तेथेच विलगिकरण कक्षात असल्यामुळे त्यांनाही कोरोनाची पॉझिटिव्ह लक्षणे आढळून आली होती त्यानुसार त्यांनाही उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्यात आले होते. परंतु या दोघींचीही तब्बेत उत्तम असून त्या दोघींचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्याचत्या प्रमाणेमुळे त्या येथील एक पुरुष देखील बाधित आढळला होता तोही तंदुरुस्त असल्याने रविवारी माथेरानमध्ये येत आहेत. माथेरान कोरोना मुक्त असल्याचे सिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी माथेरानकरांच्या वतीने या सर्वांवर पुष्पवृष्टी करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माथेरान कोरोना मुक्त रहावे याकरिता माथेरानमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांनी खूपच मेहनत घेतली.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply