चौघांचा मृत्यू; 68 जणांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 29) कोरोनाचे तब्बल 181 रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पनवेल पालिका हद्दीत 131 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 61 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे 50 रुग्ण आढळले आहेत तर दिवसभरात सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत पनवेल कोळीवाडा येथील 60 वर्षीय महिला, नवीन पनवेल सेक्टर 9 च्या प्रेरणा अपार्टमेन्ट मधील 57 वर्षीय पुरुष, कामोठे सेक्टर 19 प्रेशियस रेसिडन्सी येथील 61 वर्षीय महिला, कळंबोली सेक्टर 11 निलसंकुल येथील 61 वर्षीय पुरुष असे एकूण चार रुग्णांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
पनवेल पालिका हद्दीमधील आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेलमध्ये 33, नवीन पनवेलमध्ये 15, कळंबोलीमध्ये 20, कामोठे येथे 23, खारघरमध्ये 33, तळोजामध्ये सात अशी विभागवार आकडेवारी आहे. तर बरे झालेल्या रुग्णसंख्येमध्ये पनवेलमध्ये 20, नवीन पनवेलचे दोन, कळंबोलीतील 12, कामोठे येथील नऊ, खारघरमध्ये 14, तळोजा येथे चार यांचा समावेश आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 2014 रुग्ण झाले असून 1248 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 61.97 टक्के आहे. 690 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीण भागात नवीन आढळलेल्या रुग्णांमध्ये उलवे सात, बारापाडा सहा, करंजाडे, दिघाटी, सुकापूर, येथे प्रत्येकी पाच, नेरे चार, विचुंबे, कोळवाडी तीन, बामणडोंगरी दोन, उसरली खुर्द दोन, तूराडे, आदई, साई, पेठगाव, विहिघर, शिरढोण, देवद, तरघर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये आकुर्ली येथील दोन, कानपोली, डेरवली, उसरली खुर्द, उलवे, आरवली येथे प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. एकुण रुग्णसंख्या 780 असून 331 रुग्ण बरे झाले तर 291 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 227 कोरोनाबाधित
नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत सोमवारी (दि. 29) 227 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर; 102 जून कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजतागायत एकूण सहा हजार 427 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण तीन हजार 632 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य स्थितीत नवी मुंबईत दोन हजार 588 रुग्ण उपचार घेत आहेत.
सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 207 वर पोहोचली आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 29, नेरुळ 28, वाशी 31, तुर्भे 14, कोपरखैरणे 38, घणसोली 31, ऐरोली 41 व दिघा 15 असा समावेश आहे.
उरण तालुक्यात पाच जणांना कोरोना
चौघांची कोरोनावर मात; एकाचा मृत्यू
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात सोमवारी (दि. 29) सिडको कॉलनी (उरण) येथील 50 वर्षीय महिला, गोवठणे (उरण) येथील 50 वर्षीय महिला, रांजंणपाडा जासई येथील 48 वर्षीय पुरुष, टाकीगाव येथील 52 वर्षीय पुरुष, नवीन शेवा येथील 48 वर्षीय पुरुष हे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले.तसेच उरण तालुक्यातील वेश्वी (उरण) येथील 42 वर्षीय महिला, रांजणपाडा येथील 23 वर्षीय महिला व तीन वर्षीय मुलीला, नागाव येथील 56 वर्षीय पुरुष यांना डिस्चार्ज देण्यांत आला आहे व म्हातवली येथील 56 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 260 झाली आहे. त्यातील 203 बरे झालेले असून त्यांना डिस्चार देण्यात आला आहे . फक्त 53 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
वासांबे येथे आणखी दोघांना झाली लागण
मोहोपाडा : प्रतिनिधी – वासांबे (मोहोपाडा) हद्दीत गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या वाढत आहे. तलेगाववाडी वृध्दाश्रमातील एका 75 वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. तर रिस येथील एका तरुणाचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.
वासांबे मोहोपाडा हद्दीत एकूण 14 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. कोरोनाचा फैलावर वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेरळ आणि श्रीवर्धनमध्ये डॉक्टर्सना संसर्ग
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोनाची संसर्ग वाढत चालला आहे, त्यात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह बनले आहेत. त्यामुळे त्यांना नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ साईमंदिर परिसरात असलेला दवाखाना 15 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तर आज कोरोनाचे पाच नवीन रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 133 इतकी झाली आहे.
कर्जत तालुक्यातील वंजारपाडा येथील 45 वर्षीय डॉक्टर, चिंचवली येथील केश कर्तनालय चालविणारा तरुण, बोरवाडी येथील पाच वर्षांचा मुलगा, कर्जत शहरातील मुद्रे येथील आणखी तिघांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यात नेमिनाथ अपार्टमेंट 25 वर्षीय, स्वप्ननगरी भागातील 48 वर्षीय पुरुष आणि 45 वर्षीय स्त्री रुग्णांचा समावेश आहे. कर्जत तालुक्यात आज च्या 5 नवीन रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 133 वर पोहचली आहे.
श्रीवर्धन : प्रतिनिधी – श्रीवर्धन तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून श्रीवर्धन शहरातील एक व बोर्लीपंचतन येथील एक अशा दोन नामांकित डॉक्टर्सना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. ते याआधी पॉझिटीव्ह ठरलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, श्रीवर्धन तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 24 झाली आहे. यापैकी 10 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत तर दुर्दैवाने 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 11 जणांवर उपचार सुरू आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper