पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपच्या राज्य कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. या कार्यकारिणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, पाच महामंत्री, एक कोषाध्यक्ष, प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्य, कार्यसमिती सदस्य, निमंत्रित सदस्य, मोर्चा, प्रकोष्ट, मीडिया, सोशल मीडिया आदींचा समावेश आहे. यातील प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश उपाध्यक्षपदी राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हलवणकर, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, कपिल पाटील, डॉ. भारती पवार, जयप्रकाश ठाकूर; महामंत्री म्हणून सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय; संघटन महामंत्री म्हणून विजय पुराणिक, कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा, तर प्रदेश कार्यसमिती विशेष निमंत्रित सदस्यपदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे-पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, नारायण राणे, माजी खासदार किरीट सोमय्या, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार आशीष शेलार, हरिभाऊ बागडे, सुधीर मुनगंटीवार, संभाजी पाटील-निलंगेकर, प्रवीण दरेकर, योगेश सागर, माजी आमदार गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, विनोद तावडे, उदयनराजे भोसले आदी एकूण 58 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निमंत्रित सदस्य म्हणून जगन्नाथ पाटील, सुरेश हावरे, मधू चव्हाण, नीलेश राणे, पाशा पटेल, बाळासाहेब पाटील, राजेंद्र मिरगणे, संजीव नाईक, लक्ष्मणराव ढोबळे अशी एकूण 139 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी उमा खापरे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी विक्रांत पाटील, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी सुधाकर भालेराव, अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्षपदी डॉ. अशोक उईके, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी हाजी. मो. एजाज देशमुख, किसान मोर्चा अध्यक्षपदी अनिल बोंडे, इतर मागासवर्गीय जाती (ओबीसी) मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची तसेच प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यपदी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …
RamPrahar – The Panvel Daily Paper