Breaking News

तळोजा येथे वृक्षारोपण

पनवेल : बातमीदार

तळोजा 102 वाहिनी द्रुत कार्यबल यांच्याकडून रोडपाली वनक्षेत्र, पांडवगड, धामोळे गाव, भंडारली वनक्षेत्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.

बटालियनद्वारे कडुनिंब, अर्जुन, पिंपळ, मोलश्री, अमलतास, गुलमोहर, अशोक, लोनजी फ्लोलिया यासारखे वृक्ष लावण्यात आले. वृक्षारोपणाच्या दरम्यान नागरिकांना समजावण्यात आले की वनमहोत्सव हे आपल्या भारत देशासाठी आवश्यक आहे. देशाची समृद्धी करायची असेल तर वृक्षांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे असून आपण आपली धरती सुजलाम सुफलाम् करण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे यावेळी

सांगण्यात आले.

या वेळी संजय लाटकरपोलीस महानिरीक्षक, भापोसे, डॉ. जितेंद्र रामगावकर जिल्हा वन अधिकारी ठाणे, राजेश कुमार कमांडंट आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply