Breaking News

डॉ. चेतन म्हात्रे यांची पुनर्नियुक्ती

नागोठणे : प्रतिनिधीयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांचा 29 जून रोजी केंद्रातील सेवेचा करार संपुष्टात आला होता. कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट सेवा बजावत असतानाच त्यांचा करार संपल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र एका चांगल्या डॉक्टरला मुकणार असे वाटत असतानाच जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. चेतन म्हात्रे यांची वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील 11 महिन्यांसाठी पुनर्नियुक्ती केली आहे. डॉ. म्हात्रे यांच्या पुनर्नियुक्तीमुळे शहरासह संपूर्ण विभागात समाधान व्यक्त केले जात आहे.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply