पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 12) कोरोनाचे 893 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 14 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 659 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन तसेच खालापूर व अलिबाग येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुक्यात 429, अलिबाग 93, रोहा 87, पेण 79, माणगाव 78, खालापूर 42, उरण 28, कर्जत 23, महाड 13, पोलादपूर सात, तळा व म्हसळा प्रत्येकी पाच, तर सुधागड व श्रीवर्धनमध्ये प्रत्येकी दोन असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 36,343 व मृतांची संख्या 988 झाली आहे. जिल्ह्यात 28,910 जण कोरोनामुक्त झाल्याने 6445 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper