मुंबई : रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केल्याबद्दल त्यांचे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी दूरध्वनीवरून आभार मानले.
पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्तपत्रसृष्टी हळहळली, तर कुटुंबीयांवर जणू आभाळ कोसळले. अशा संकटकाळात लोकनेते रामशेठ ठाकूर पवार कुटुंबीयांच्या मदतीला धावून गेले. या पार्श्वभूमीवर नरेंद्र वाबळे यांनी त्यांचे आभार मानताना, आपण साक्षात देवदूत आहात. कोरोना काळात आपण हजारो लोकांना शिधावाटप केल्याचे मी ऐकून आहे. आमच्या एका व्यवसाय बंधूच्या कुटुंबीयांना मदत करून आपण फार मोठे काम केले आहे. आपले मन:पूर्वक आभार, असे म्हटले आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper