Breaking News

पाली येथील अंगणवाडीत फुलली परसबाग

पाली ः प्रतिनिधी

एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महाअभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्र पाली बेघरआळी येथे परसबाग करण्यात आली होती. ही परसबाग अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होती. या वेळी मार्गदर्शन व जनजागृतीही करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

   या अभियानांतर्गत पहिले एक हजार दिवस बाळाचे, रक्ताशय, अतिसार, हात धुणे आणि पौष्टिक आहार, वैयक्तिक स्वच्छता व कोरोनासंबंधी माहिती हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच कुपोषण आणि आरोग्यासंबंधी शपथ घेऊन जनजागृती करण्यात आली. कोविडच्या पार्श्वभूमीवरदेखील या काळात अतिशय नियोजनबद्ध काम व जनजागृती केली जात आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रकल्प अधिकारी रंजना म्हात्रे, पर्यवेक्षिका सुनीता भुरे, संगीता लखीमळे, जयेश पाटील, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर उत्साहात

आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राचे अष्टपैलू, कार्यकुशल, विकासाभिमुख आणि लोकप्रिय …

Leave a Reply