Breaking News

भाजपकडून गरजूंना चष्मेवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि खारघर तळोजा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू लोकांसाठी सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चश्मे वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी (दि. 24) खारघर सेक्टर 12 येथील खारघरचा राजा गणपती मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. सर्व चश्मे धारकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक निर्दोष केणी आणि सहप्रमुख आशा बोरसे असून कार्यक्रमाला खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला अध्यक्षा वनिता पाटील, जिल्हा उपाध्यक्षा महिला मोर्चा संध्या शारबिद्रे, खारघर शहर उपाध्यक्षा निशा सिंग, महिला उपाध्यक्षा प्रतिक्षा कदम, महिला सरचिटणीस साधना पवार, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजिका मोना अडवाणी, चांदणी अवघडे, सीमा खडसे, राजश्री नोएडा आदी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply