Breaking News

रायगड जिल्ह्यात 230 नवे पॉझिटिव्ह; सात रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा जोर दिवसेंदिवसत ओसरत असून, गुरुवारी (दि. 15) नव्या 230 रुग्णांची आणि सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 376 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 140 व ग्रामीण 38) तालुक्यातील 178, रोहा 11, उरण व अलिबाग प्रत्येकी आठ, खालापूर सहा, पेण, मुरूड, माणगाव प्रत्येकी चार, कर्जत तीन, महाड दोन आणि म्हसळा व पोलादपूर येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल मनपा, खालापूर, कर्जत प्रत्येकी दोन व अलिबाग येथे एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 51,415 आणि मृतांची संख्या 1455 झाली आहे. जिल्ह्यात 47,329 जण कोरोनामुक्त झाल्याने 2631 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply