पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील वाकडी गाव येथे प्राथमिक शाळा ते शशिकांत खुटले यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि नवीन गटारांचे बांधकाम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार निधीमधुन करण्यात येणार आहे. या कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी (दि. 24) करण्यात आले.
हा रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी आठ लाख आणि नवीन गटारांच्या बांधकामासाठी आठ लाखांचा स्थानिक आमदार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भुपेंद्र पाटील, तालुका सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष राजेश पाटील, वाकडीच्या सरपंच कुंदा पवार, उपसरपंच अरुण पाटील, सदस्य मंगेश पाटील, सदस्य प्रभावती खुटले, निता पाटील, रेणुका जमदाडे, माजी सरपंच नरेश पाटील, नामदेव जमदाडे, विलास चोरघे, शाखा अध्यक्ष संतोष पाटील, गणेश खुटले, बाळू पवार, शशीकांत खुटले, जनार्दन पाटील, प्रल्हाद खुटले, जयदास पाटील आदी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper