Breaking News

स्मशानभूमीत काम करणार्या कर्मचार्यांना दिवाळी भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली तरी अजूनही कोरोनाचा प्रभाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. कोरोना काळातही पनवेलमधील अमरधाम आणि पोदी येथील स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपले कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांनी केलेल्या या सेवाकार्याबद्दल तसेच दिवाळी सणानिमित्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार सभागृह नेते परेश ठाकूर यांनी त्यांना भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, शक्तीकेंद्र प्रमुख प्रशांत फुलपगारे, ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत भुजबळ, राकेश भुजबळ आदी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply