Breaking News

रोहित शर्माने केली टीकाकारांची बोलती बंद

ब्रिस्बेन ः वृत्तसंस्था

रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला खरा, पण त्यानंतर रोहितवर काही जणांनी टीका केली होती. रोहित अजूनही पूर्णपणे फिट नसल्याचे काही टीकाकारांनी म्हटले होते, पण रोहितने या टीकाकारांची बोलतीच बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण रोहितचा एक भन्नाट व्हिडीओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाला आहे.

रोहित शर्मा पूर्णपणे फिट नाही आणि त्यामुळे तो चांगले क्षेत्ररक्षण करताना दिसत नाही, अशी टीका रोहितवर करण्यात आली होती, पण नुकत्याच झालेल्या सामन्यात मात्र रोहितने या टीकाकारांची तोंडं बंद केली. रोहितने या सामन्यात एक अफलातून झेल पकडला आणि आपल्या कामगिरीतूनच टीकाकारांना उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

Check Also

अमिताभ बच्चन ‘न दिसलेला, न पाहिलेला’

आज ११ ऑक्टोबर २०२६ शहेनशहा अमिताभ बच्चनचा ८४वा वाढदिवस आणि या वयातही कार्यरत. या अष्टपैलू …

Leave a Reply