Breaking News

खालापुरात गांजा विकणारे चौघे अटकेत

आरोपीमध्ये एक नायजेरियन

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यात दोन ठिकाणी गांजाची विक्री करणार्‍या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीत एका नायजेरियन इसमाचा समावेश असल्याने आंतराराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे.

रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहपाडा गावाच्या मच्छिमार्केटच्या गल्लीजवळ निखिल अरूण शिंदे (वय 24, रा. दहिवली, ता.कर्जत) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि. 26) संध्याकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचीत निखिल शिंदेला ताब्यात घेतले. त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता, त्याने मेफेड्रॉन व गांजा असे अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीकरीता आणल्याचे उघड झाले. जवळपास 38 हजार रूपये किंमतीच्या मेफेड्रॉन व 1800रूपये किंमतीच्या गाजासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण एक लाख 16हजार 10रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. निखिल शिंदेला आणि त्याला अमली पदार्थ पुरविणारा एन. पॉल नाचोर (वय 28, सध्या रा. बोनकोडेगाव, नवी मुंबई,  मुळ रा. नायजेरीया) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संदिप पोमण करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत खोपोली नगरपालिका हद्दीतील लौजी रेल्वे स्थानकात गांजा विक्रीसाठी आलेल्या गौतम किसन जोशी (वय 41, रा. वांगणी, ता. अंबरनाथ) आणि पंकेश जनार्दन कोळंबेरा (रा. चांदई, ता. कर्जत) यांना खोपोली पोलिसांनी रंगेहाथ पकडून चार किलो 902 ग्रॅम गांजा  हस्तगत केला. त्या दोघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास महिला सपोनि साधना पाटील करीत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply