Breaking News

‘चतुरंग रागा‘ने पनवेलकर श्रोते झाले मंत्रमुग्ध

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून चतुरंग राग 2021  या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले. ’चतुरंग गावो गुनी सब मिलकर’ या घोषवाक्याने नटलेला हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमात मधुवंती, बिहाग, बागेश्री, सोहनी अशा रागांतील, बडा ख्याल, द्रुत बंदिश, तराणे व अभंग आठ गायकांनी सादर केले. ज्येष्ठ गायक पं. मिलिंद गोखले, वीणा कुलकर्णी, मंदार भिडे, मधुरा सोहनी, संध्या घाडगे, वर्षा सहस्रबुद्धे, अनिल खोसरे, गणेश गोंधळी या गायक कलाकारांनी आपल्या मधूर गायनाने उपस्थित रसिक पनवेलकरांची मने जिंकली. अनंत कर्वे यांनी संवादिनी, किशोर पांडे यांनी तबला व धनंजय खुटले यांनी पखवाज साथ केली. सुप्रिया ताह्मनकर यांनी अभ्यासपूर्ण निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. या वेळी पं. मेघनाथ कोल्हापुरे, अनिता कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, रमेश गोंधळेकर, प्रभाकर आघारकर या ज्येष्ठ गायक व वादक कलाकारांचा सत्कार झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायक डॉ. मोहन दरेकर, भजनी कलाकार चंद्रकांत मने, गायिका रेणुका दलाल, पद्मजा कुलकर्णी, तबलागुरू रेवनाथ भाग्यवंत, विनायक प्रधान, श्रीकांत पोवळे आदी मान्यवरांसह पनवेलकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खानावमध्ये शेकाप कार्यकर्ते भाजपात

आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा …

Leave a Reply