नाशिक : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असून, रुग्णांचे हाल होत आहेत. अशाच प्रकारे नाशिकमध्ये उपचाराअभावी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
नाशिकमध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग बेफाम वेगाने वाढत आहे. भाऊसाहेब काळे या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते, मात्र शहरातील रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी कुटुंबासह नाशिक महापालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता.
ऑक्सिजन लेव्हल 36 असूनही ते बेडसाठी शहरभर फिरले होते. अखेर ऑक्सिजन लावूनच त्यांनी मनपाचे कार्यालय गाठले. त्यानंतर त्यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेही त्यांना व्हेंटिलेटर मिळू शकला नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू दुर्दैवी झाला. त्यांच्या मृत्यूमुळे राज्यात कोरोना रुग्णांची किती फरपट होत आहे हे समोर आले.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper