Breaking News

आंद्रे रसेल पीसीएलमध्ये खेळणार!

स्टार परदेशी खेळाडूंचा सहभाग

इस्लामाबाद ः वृत्तसंस्था
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) जूनमध्ये पुन्हा खेळवण्यात येणार आहे. या लीगसाठी परदेशी खेळाडूंच्या बदली खेळाडूंची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल याच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यात सुरू झालेली ही स्पर्धा पहिल्या टप्प्यानंतर स्थगित करण्यात आली होती आणि आता लीगचा दुसरा टप्पा 1 जूनपासून सुरू होणार आहे.  
जगातील ट्वेण्टी-20 खेळाडूंमध्ये तिसरा सर्वोत्तम खेळाडू असलेला वेस्ट इंडिजचा अष्टपैलू रसेल क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. इंग्लंडचा टॉम बँटन याला त्याने रिप्लेस केले आहे. रिल्पेसमेंट ड्राफ्टमध्ये 19 खेळाडूंची निवड झाली आहे. पेशावर झाल्मी, ग्लॅडिएटर्स आणि इस्लामाबाद युनायटेड यांना आणखी एका खेळाडूची निवड करायची आहे आणि त्यांनी हा निर्णय राखून ठेवला आहे.  
बांगलादेशचा शाकिब अल हसन याला लाहोर कलंदर्स, न्यूझीलंडचा मार्टीन गुप्तील याला कराची किंग्स आणि ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा याला इस्लामाबाद यांनी करारबद्ध केले आहे.  
रिल्पेसमेंट खेळाडूंची नावे
इस्लामाबाद युनायटेड ः उस्मान ख्वाजा (अ‍ॅलेक्स हेल्स), जॅनेमन मलान (लुईसल ग्रेगोरी)
कराची किंग्स ः मार्टीन गुप्तील (कॉलीन इंग्राम), थिसारा परेरा (मोहम्मद नबी), नजीबुल्लाह झाद्रान (डॅन ख्रिस्टीयन), लिटन दास (जो क्लार्क)  
लाहोर कलंदर्स ः शाकिब अल हसन (राशिद खान), जेम्स फॉल्कनर (डेव्हिड वीज), जो बर्न्स (समित पटेल), कॅलम फर्ग्युसन (टॉम अ‍ॅबेल), सीक्कूग प्रसन्ना (जोए डेन्ली)
मुल्तान सुल्तान ः महमुदुल्लाह (ख्रिस लीन), रहमनुल्लाह गुर्बाज (जेम्स व्हिन्सी), जॉर्ज लिंडे (अ‍ॅडम लिथ), ओबेड मॅकॉय (कार्लोस ब्रेथवेट)
पेशावर झाल्मी ः फॅबियन अ‍ॅलन (मुजीब उर रहमान), रोवमन पॉवेल (लायम लिव्हिंगस्टोन), फिडेल एडवर्ड्स ( साकिब महमूद)  
क्यूएत्ता ग्लॅडिएटर्स ः आंद्रे रसेल (टॉम बँटन).

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply