Breaking News

खालापूर पोलीस ठाण्याने घेतली पाच गावे दत्तक

खालापूर : प्रतिनिधी

कोरोनाकाळात विशेष दक्षता घेण्यासाठी खालापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल विभूते यांनी पाच गावे दत्तक घेऊन नवा उपक्रम सुरू केला असून, त्याचा शुभारंभ बुधवारी (दि. 28) माडप गावापासून करण्यात आला. कोरोनाला अटकाव करण्याच्या हेतुने खालापूर पोलीस ठाण्याने तालुक्यातील माडप, नारंगी, भिलवले,   शिरवलीवाडी आणि केळवली ही गावे दत्तक घेतली असून, तेथे कोरोनाविषयी मार्गदर्शन करुन विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर बीट अंमलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलीस पाटील यांच्यासह ग्रामकृती दलाची स्थापना करण्यात आली  असल्याची माहिती निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली. या उपक्रमात ग्रामकृती दलामार्फत गावातील सर्व ग्रामस्थांची ऑक्सिजन व थर्मल स्क्रीनिंग तपासणी करण्यात येत आहे, 18 ते 45 वर्षे वयोगटातील ग्रामस्थांचे लसीकरण तसेच इतर व्याधीग्रस्तांना उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकार्‍यांची संपर्क करून आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवण्यात येईल, सामाजिक अंतर या नियमाचे पालन करून अत्यावश्यक वस्तू वितरणाबाबत  नियोजन करण्यात येत आहे. तसेच निराधार महिला, एकाकी राहणारे ज्येष्ठ नागरिक, दारिद्रय रेषेखालील कुटुंबे यांना अन्नधान्य पुरवठा करण्याचे नियोजन केले जात असल्याचे पोलीस निरीक्षक विभूते यांनी सांगितले. या दत्तकगाव उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी माडप गावात करण्यात आला. वेळी खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, सहाय्यक निरीक्षक संजय बांगर, उपनिरीक्षक गायत्री जाधव, स्वप्नील सावंतदेसाई, पोलीस नाईक नितीन शेडगे, अमित सावंत, कॉन्स्टेबल विठ्ठल घावस, तुषार आठरे यांच्यासह माडप ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply