Breaking News

कळंबोलीतील गटाराची भाजप पदाधिकार्‍यांकडून पाहणी

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोली मधील प्रभाग 8 मध्ये केएल 2 या ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावरती जात आहे व तेच घाण पाणी बाजूच्या उद्यानात जात आहे. त्यामुळे तेथे डासांची उत्पत्ती झालेली आहे. या सार्‍यांचा त्रास तेथील नागरिकांना होत आहे. याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते उद्धव भुजबळ यांनी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष बबन बारगजे यांना सांगितली. त्यानुसार भाजप पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 21) या गटार व विभागाची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी बबन बारगजे यांच्यासह प्रभागाचे नगरसेवक बबन मुकादम, तसेच कळंबोली मंडळ अध्यक्ष रवीनाथ पाटील, प्रभागाचे अध्यक्ष प्रकाश शेलार, कळंबोली शहर सरचिटणीस दिलीप बिस्ट, मनिष अरबट आदी उपस्थित होते. या वेळी नगरसेवक बबन मुकादम यांनी तत्काळ ही समस्या पनवेल महापालिकेच्या कर्मचार्‍यांना सांगून तेथील साफसफाई व कचरा उचलण्याचे निर्देश दिले, तसेच गटारांचा पाठपुरावा सिडकोकडे करण्यात येईल असे सांगितले. कळंबोलीतील ज्या ज्या समस्या सिडकोकडे आहेत त्याचा लवकरात लवकर पाठपुरावा केला जाईल, असे रवीनाथ पाटील यांनी सांगितले. तेथील रहिवाशांनी समस्यांची दखल घेतल्याबद्दल भाजप पदाधिकार्‍यांचे आभार मानले. रहिवाशांनी गटाराचे घाण पाणी रस्त्यावर व उद्यानात जाणे बंद करण्याची मागणी केली.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply