Breaking News

खांदा कॉलनीत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर

खांदा कॉलनीतील बुद्धविहारात तथागत गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी सर्वप्रथम बौद्ध उपासिका सरला शरद जाधव यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच निर्मला तायडे यांच्या हस्ते तथागताला पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन चंद्रसेन कांबळे यांनी केले ते म्हणाले की, प्रत्येक बौद्ध उपासकाने पंचशील व 22 प्रतिज्ञांचे पालन करावे. प्रत्येक रविवारी न विसरता सर्वांनी बुद्ध विहारात येण्याची कृपा करावी. त्यातून आपल्याला धम्माचे ज्ञान मिळते, असे या वेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश जाधव होते. या वेळी सामुदायिक वंदना भारतीय बौद्ध महासभा यांनी घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीजे जाधव, विश्वास भालेराव, शामराव तोरणे, राजू इंगळे यांनी मेहनत घेतली. भगवान कदम, अंकुश वाघमारे, राजेंद्र बावस्कर, पुंजाजी तायडे, पंचशीला भद्रे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply