कोल्हापूर ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार बुधवारी (दि. 16) कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी मूक आंदोलन होणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी तयारीची पाहणी केली तसेच विविध गोष्टींचा आढावा घेतला.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, हे मूक आंदोलन आहे. अनेकांना वाटते हा मोर्चा आहे. आपल्याला मूक मोर्चा काढायचा असता तर आपण काढू शकलो असतो, पण मोर्चा काढण्याची ही परिस्थिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा लोकांना आपण वेठीस का धरायचे? ज्या समाजाला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, त्यांनी आपल्या 58 मोर्चांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. समाज बोलला आहे, त्याने पुन्हा रस्त्यावर का उतरायचे? आतापर्यंत समाजाने आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनीही बोलले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे.
आंदोलनात माझ्यासह आपण सर्वांनी मौन राखायचे आहे. येथे येणार्या लोकप्रतिनिधींना बोलू द्यायचे, त्यांचे मन मोकळे करू द्या. मला विश्वास आहे ते सर्व जण येतील, असेही संभाजीराजेंनी नमूद केले. दरम्यान, मराठा क्रांती मूक आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper