Breaking News

फसवणूकप्रकरणी पनवेल शेकाप उपाध्यक्ष अब्दुल कच्छी गुजरात पोलिसांच्या ताब्यात

पनवेल ः वार्ताहर

शेकापचे पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी यांना गुजरात राज्यातील पोलिसांनी फसवणूकप्रकरणी पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरातून ताब्यात घेतले आहे. शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी (44)  यांच्यावर यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा 420, 120 बीसह आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुजरात राज्यात दाखल करण्यात आल्याने सायबर क्राइम पोलीस स्टेशन अहमदाबादचे सबइन्स्पेक्टर के. एम. परमार आणि त्यांच्या पथकाने पनवेलजवळील नांदगाव हद्दीत असलेल्या मॅरेथॉन कॉलनीतून स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन गुजरात येथे रवाना झाले आहेत. शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ‘एनआयए’ने अटक केल्यानंतर आता राज्याच्या सीआयडीला जाग आली असून त्यांनी या घोटाळ्यात 513 कोटी नसून 543 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असे म्हटले आहे.

एकामागोमाग शेकाप नेते भ्रष्टाचारात गुंतल्याचे समोर येत आहे. माजी आमदार विवेक पाटील यांच्या वाढदिवशीच अब्दुल कच्छी यांनाही गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शेकापच्या इतिहासात ‘मानाचा तुरा’च रोवला गेला आहे.

-जवाद मुकीद काझी, अध्यक्ष, भाजप उत्तर रायगड जिल्हा अल्पसंख्याक युवा मोर्चा

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply