Breaking News

रस्त्यावर कचरा न टाकण्याचे अनोखे आवाहन

नगरसेवक राजू सोनी यांची संकल्पना

पनवेल : वार्ताहर

रहिवाशांसह दुकानदारांनी त्यांच्या घरातील तसेच दुकानातील साठणारा कचरा उघड्यावर रस्त्यावर फेकू नये व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने नगरसेवक राजू सोनी यांनी स्वखर्चाने एक संकल्पना योजली. यामध्ये परिसरात दोन फुलझाडांच्या चांगल्या कुंड्या ठेवून तसेच फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील टपाल नाका, कानिफनाथ मंदिर मुख्य रस्त्यावर येथील व्यापारी व आजुबाजुच्या परिसरातील नागरिक नेहमी कचरा टाकत असल्याने त्या परिसरात खूप घाण वास येत होता तसेच लाईटच्या ट्रान्स्फरमरखाली कचरा जाऊन येथे दर आठ ते 10 दिवसांनी त्यातून धूर निघायचा. ही बाब नगरसेवक राजू सोनी यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच राजू सोनी यांना सांगून त्यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे सफाई कामगार व घंटागाडी बोलवुन येथील परिसर स्वच्छ करून दिला व आजपासुन येथे कचरा टाकण्यास बंद केले. त्यामुळे तेथे काही दिवसासांठी एक सफाई कामगार सुध्दा ठेवण्यात आला आहे. तसेच तेथे स्वखर्चाने दोन कुंड्या ठेऊन फलक लाऊन नागरिकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशाच प्रकारे हा उपक्रम राबविल्यास पनवेलच्या स्वच्छतेत अजून भर पडणार आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply