Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कामोठ्यातील गोवारी कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कामोठे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू काल्या गोवारी ऊर्फ विठूशेठ यांचे नुकतेच निधन झाले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठ्यात जाऊन गोवारी कुटुंबीयांचे सांत्वन केले. विठूशेठ गोवारी यांचे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य राहिले आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलची 15 वर्षे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळली. प्रेमळ, हसतमुख आणि मनमिळावू म्हणून विठूशेठ परिचित होते. त्यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि. 24) निधन झाले. हे वृत्त कळताच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कामोठे येथे गोवारी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रांत काम करणारा आणि समाजाची जाण असलेला ज्येष्ठ कार्यकर्ता हरपल्याचे उद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आदरांजली वाहताना काढले. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, दिलीप पाटील, तसेच प्रदीप भगत, ज्येष्ठ कार्यकर्ते सुधाकर पाटील, रमेश म्हात्रे, प्रकाश पाटील, संतोष म्हात्रे, आर. जी. म्हात्रे, गणेश भगत, गोपीनाथ गोवारी, मधुकर सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. विठूशेठ गोवारी यांचा दशक्रिया विधी 2 ऑगस्ट रोजी भिंगारी येथील श्रीक्षेत्र मामा भाचे येथे, तर उत्तरकार्य 5 ऑगस्टला कामोठे येथे घरी होणार आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply