Breaking News

कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच फेरीत गारद; तरीही मेडल जिंकण्याची संधी!

टोकियो ः वृत्तसंस्था

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली, मात्र सोनम अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. ऑलिम्पिकला जाणारी भारतातील सर्वांत तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती. शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत ती 2-0 अशी आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. त्यानंतर जास्त गुणांचा डाव खेळल्यामुळे मंगोलियन कुस्तीपटूला विजेता घोषित करण्यात आले. महिलांच्या फ्रीस्टाईल 62 किलो वजनी गटात हा सामना रंगला.जर मंगोलियाची खुरेलखू अंतिम फेरीत पोहचली, तर सोनम मलिकला रेपेचेज फेरी खेळण्याची संधी मिळेल, जेणेकरून ती कांस्यपदक जिंकेल.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply