आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलच्या व्यापार्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर

’पुरग्रस्तांना सढळ हाताने मदत करा’ या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आवाहनाला पनवेलमधील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यातील एक प्रतिष्ठीत व्यापारी चंद्रकांत रिखबदास चोरडीया यांनी त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात पुरग्रस्तांसाठी नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस व गाऊन मदत म्हणून दिले आहे.

शहरातील व्यापारी चंद्रकांत चोरडीया यांचा व्यापार कमी प्रमाणात आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या लॉकडाऊनचा फटका त्यांना सुद्धा बसला आहे. व्यवसाय अर्ध्यावर आला आहे, परंतु कोकणातील बांधवांवर कोसळलेले संकट हे आपल्यावर कोसळलेले संकट आहे व त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. हे मानून त्यांनी नवीन कोरे वेगवेगळ्या प्रकारचे 100 ड्रेस व माता भगिनींसाठी 50 गाऊन आणून ती मदत पुरग्रस्तांसाठी केली आहे. या वेळी प्रभाग 19चे नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर आदींच्या उपस्थितीत ही मदत त्यांनी पूरग्रस्तांना रवाना केली आहे. या मदतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनापासून कौतुक करून अशीच गोरगरीबांसाठी मदत सर्वांनी करावी, असे आवाहन सुद्धा केले आहे.

Check Also

Genau so wie konnte gentleman hundred Freispiele abzuglich Einzahlung as part of Gemein… Casinos gebrauchen?

Obwohl ein winzig luckenlosen Nutzbarkeit solltest du unser Leistungsnachweis via dein Spielverhalten asservieren Selbige vergutungsfrei …

Leave a Reply