Breaking News

चौकमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

चौक : रामप्रहर वृत्त

विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी 75 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई अविनाश देशमुख यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहन करण्यात आले.

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्रभाई शहा, सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा, मुख्याध्यापक बादशा भोमले, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. आरएसपीचे शिक्षक कुंभार सर व विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली तर अनिल बडेकर यांनी उपस्थितांना तंबाखूमुक्त राष्ट्रीय अभियानाची शपथ दिली.

सारंग येथील शाळेत ध्वजारोहण

विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या सारंग येथील विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्रभाई शहा, सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा या वेळी उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply