Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक सप्ताह

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (दि. 21)पासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यास सुरूवात झाली. 21 ते 28 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या या मोहिमेचे सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या मोहिमेंतर्गत 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना वयोगटानुसार जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येत आहे. अंगणवाडी शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून या गोळ्यांचे वाटप होत आहे.

अनेकदा बालकांमध्ये कृमीदोष आढळून यतो. या कृमी दोषामुळे मुलांची शारीरिक व बौध्दीक वाढ खुंटते. ही बाब लक्षात घेऊन या आजाराला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाते. बालकांमधील जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी देणे महत्त्वाचे असते. यासाठी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत 19 वर्षापर्यंतच्या बालकांना चावून खावयाच्या जंतनाशक गोळीचे वाटप करण्यात येत आले.

या मोहिमचे प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशीला घरत व नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी नगरसेविका चारुशीला घरत, भाजप पनवेल शहर महिला अध्यक्ष वर्षा नाईक, नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय बहिरा, तसेच राकेश भुजबळ, मनोहर मुंबईकर आदी उपस्थित होते.

मोहीम  यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply